शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता या माध्यमातून मिळवलं आहे. तसेच त्यासाठी गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या याच आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असून राऊतांच्या आरोपांवर शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात माणूस कधी वर जातो, कधी खाली जातो. मात्र इतकं निराश होऊन, मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटतं, की आपण ज्यांना मोठे नेते म्हटलं तेच नेते संजय राऊतांसारखं निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ,” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
#SanjayRaut #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #ECI #NCP #Maharashtra #HWNews